रेडक्रॉस व समाज कल्याण विभाग जळगाव यांच्या तर्फे अक्षय महाजन यांचा पुरस्काराने सन्मान
जळगाव,दि ८(प्रतिनिधी):जागतिक दिव्यांग (सप्ताह) दिनाच्या निमीत्ताने रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाजकल्याण विभाग जि.प जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिन विशेष साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी वा संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल, पुरस्कार देण्यात येतो. त्या अनुषंगाने दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांचा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.यावेळी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपनींचाही सन्मान करण्यात आला आहे.
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री. भिमराज दराडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. विजय रायसिंग, उप जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. उल्हास पाटील फिजीयोथरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, रेडक्रॉस चे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, पुष्पाताई भंडारी, नोडल अधिकारी श्री. जी. टी. महाजन, दिव्यांग विभागाच्या श्रीमती. माधुरी भागवत, स्वयंदीप प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती. मिनाक्षी निकम, मुक्ती फाऊडेशन चे मुकुंद गोसावी, युथ फॉर जॉबचे श्री. महेंद्र पाटील उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक दिव्यांग संस्था, संघटना यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. एस. पी. गणेशकर, श्रीमती सुवर्णा चव्हाण रेडक्रॉसचे लक्ष्मण तिवारी, श्रीमती उज्वला वर्मा, श्री. मनोज वाणी, श्री. योगेश सपकाळे, श्री. समाधान वाघ तसेच सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले.