निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे यांच्या शुभहस्ते महेश शिरसाठ यांचा पुरस्काराने गौरव.. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व समाजकल्याण विभागाच्या विद्यमाने संयुक्तिक उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी):जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्ताने रेडक्रॉस सोसायटी ,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाजकल्याण विभाग जि.प जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रासह दिव्यांगांच्या हितासाठी परोपकारी कार्य करणाऱ्या व्यक्तींचे वा संस्थांचा गौरव करणे अत्यावश्यक असल्याचे हेरुन यंदा निवासी उपजिल्हाधिकारी भिमरावजी दराडे यांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था चोपडा व संस्था अध्यक्ष श्री महेश पांडुरंग शिरसाठ यांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या, डॉक्टर्स यांनाही सन्मानित करण्यात आले.
पत्रकार श्री.महेश शिरसाठ हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी, आदिवासी,दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी आपल्यापरीने जे शक्य आहे ते कार्य तळमळीने करीत असतात शिवाय शासकीय योजनांची माहितीही गरजुंपर्यंत पोहचविण्यासाठी मोलाचे परोपकारी काम करीत आहेत त्यांचे उत्कृष्ट सामाजिक कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री. भिमराज दराडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. विजय रायसिंग, उप जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आकाश चौधरी, डॉ. उल्हास पाटील फिजीयोथरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, रेडक्रॉस चे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, पुष्पाताई भंडारी, नोडल अधिकारी श्री. जी. टी. महाजन, दिव्यांग विभागाच्या श्रीमती. माधुरी भागवत, स्वयंदीप प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती. मिनाक्षी निकम, मुक्ती फाऊडेशन चे मुकुंद गोसावी, युथ फॉर जॉबचे श्री. महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक दिव्यांग संस्था, संघटना यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. एस. पी. गणेशकर, श्रीमती सुवर्णा चव्हाण, रेडक्रॉसचे लक्ष्मण तिवारी, श्रीमती उज्वला वर्मा, श्री. मनोज वाणी, श्री. योगेश सपकाळे, श्री. समाधान वाघ तसेच सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले.