उद्योजक पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ते १४ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

 उद्योजक पंकज बोरोले यांच्या वाढदिवसानिमित्त ३ ते १४ डिसेंबर दरम्यान विविध  कार्यक्रमांचे आयोजन


  चोपडा दि.८( प्रतिनिधी ): पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस ३ डिसेंबर ते १४ डिसेंबर यादरम्यान साजरा केला जात आहे. या निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

    दि. ३ ते ७ डिसेंबर दरम्यान योग व प्राणायाम शिबीराचे  आयोजन करण्यात आले . सदर शिबीर सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत घेण्यात आले. शिबीर प्रशिक्षक म्हणून श्रीमती गायत्री शिंदे यांनी काम पाहिले. दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५:३० ते ७:३०  या वेळेत श्री गुरुचरित्र पारायणाचे सामूहिक वाचन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजक म्हणून किशोर पाठक काम पाहत आहेत.

 दि.११ डिसेंबर रोजी महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दुपारी ३:३० ते ५:०० या वेळेत पंकज विद्यालयात करण्यात आले आहे.

दि.१२  डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता निवासस्थानी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीसीए लॅब उद्घाटन करण्यात येणार आहे व १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:०० वाजता युवा व्याख्याते व समाजप्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांचे चला जगुया आनंदाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .

     सामाजिक बांधिलकी जोपासणे, ग्राहकांची सेवा करणे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे ही भावना आणि शिकवण वडिलांनी  दिली आहे . त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यात युवकांसाठी उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार , उत्कृष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी पुरस्कार , समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार ,विवेक ग्रामीण केंद्राचा बांबू सेवक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने