स्व.नानाहेब ऊर्फ यशवंत हरताळकर हेच"आदर्श" जपण्याचे धडे गिरवणारे उत्तम शिक्षक : पुणे येथील व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन

 स्व.नानाहेब ऊर्फ यशवंत हरताळकर हेच"आदर्श" जपण्याचे धडे गिरवणारे  उत्तम शिक्षक : पुणे येथील व्याख्याते डॉ. सागर देशपांडे यांचे प्रतिपादन

चोपडा दि.८(प्रतिनिधी)भारत देशाच्या संस्कृतीची जगात आगळीवेगळी  ओळख असून 140 कोटी लोकसंख्या  असल्यावरही जागतिक पातळी अग्रेसर असा देश आहे .पण या देशातील फॅमिली आज नॅनो कार प्रमाणे नॅनो फॅमिली झाल्या असून  एकत्र कुटुंबात राहण्याचा आनंद, आदर्श , आपली मुलं गमावण्याची  मोठी भिती निर्माण झाली आहे.तरी आपल्यातील आदर्श जिवंत कसा ठेवता येईल यासाठी आपण काय केले पाहिजे याचे महत्त्वपूर्ण  मार्गदर्शन पुणे येथील प्रख्यात ज्येष्ठ पत्रकार डॉ.सागर सुधाकर देशपांडे यांनी येथे केले.

ते चोपडा शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी तथा माजी मुख्याध्यापक स्व.नानासाहेब  यशवंत गोविंद हरताळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ "आदर्शाच्या शोधात"या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला , वृध्द तसेच आई-वडिलांच्या प्रति मान  ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून हे चित्र आजच बदलविणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर "आर्दश" ह्या शब्दाला तडा पडून शोधावा लागण्याची पाळी येईल. मात्र डॉ.विकासकाका हरताळकर यांच्या सारखे दूरदृष्टी असलेल्या विचारसरणीचे व्यक्तीमत्व आज आपल्या सानिध्यात  असल्याने अनेकांना आर्दश टिकवून ठेवण्याचे धडे न कळत मिळत आहेत.एव्ढेच नव्हे कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत हरताळकर  परिवाराचे योगदान अद्वितीय असेच होते.रंजल्या गांजलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी दोन हात पुढे असणारे हे कुटुंब चोपड्याला लाभणे हे एक भाग्यच आहे.शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी घडविण्याचा कारखाना स्व.नानासाहेबांनी उघडल्याने त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत हरताळकर परिवार चालत असल्याने  इथे संस्काराचा मळा फुलला आहे.त्यामुळे संस्कारमय शाळेच्या छायेत येण्याचा आनंद द्विगुणित होतो असं मत मांडून आपण आपल्यातला आदर्श टिकवून ठेवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केले.

व्यासपीठावर माजी विधानसभा सभापती अरुण भाई गुजराती, माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, चहार्डी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सुरेशजी  पाटील, विवेकानंद हायस्कूलचे अध्यक्ष डॉक्टर विकासकाका हरताळकर, संस्थेचे उपाध्यक्ष तथा जेडीसीसी बँक संचालक घनश्याम भाई अग्रवाल, अॅड संदीप भैया पाटील, संस्थेचे सचिव अॅड रविंद्र जैन,विश्वस्त  डॉ.जयंत पाटील, विश्वस्त डॉ.मनोहर अग्रवाल,डॉ.विनीत हरताळकर, डॉ.अमित हरताळकर , पंकज शैक्षणिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी पत्रकार बांधव, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने