भरधाव बसची उभ्या ट्रॅक्टरला ठोस १ जण ठार २३जखमी

भरधाव बसची उभ्या ट्रॅक्टरला ठोस १ जण ठार २३जखमी

 धरणगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव-चोपडारोडवर आज शनिवारी दिनांक १४ डिसेंबर रोजी पहाटे पिंपळे फाट्याजवळ  एसटी बस उभ्या ट्रॅक्टरवर धडकून भीषण अपघात घडला. या अपघातात १ जण ठार झाला असून, २० प्रवासीसह चालक, वाहक असे २३ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धरणगाव तालुक्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी एसटी बसचा अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर प्रवासी जखमी झाले आहेत.

धरणगावकडून चोपडा जाणारी एस टी. जळगाव शिरपूर बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३९१०) ही पिंपळे गावाजवळ आली असताना उसाच्या उभ्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर क्रमांक (एम एच १९ ई जी ३९५२) ला ती धडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात तमराज शरद सोनवणे (वय ४८, रा. पाळधी ता. धरणगाव) हा मयत झाला आहे.  तर एस.टी. बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास धरणगाव-चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ एक एसटी बस उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडकली. धडक इतकी भीषण होती की, एसटी बसच्या चालकाच्या केबिनचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या धडकेत बस चालक आणि इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

माहिती मिळताच धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान मयत प्रवाशाचे नातेवाईक धरणगाव रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी आक्रोश केला होता घटनेची धरणगाव पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. काल शुक्रवारी धरणगाव तालुक्यातील दोनगावजवळ एसटी बस विद्युत खांबाला आदळल्याने ३१ प्रवासी जखमी झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी आता पिंपळे रोडवर घटना घडली आहे.

घटनेत वाहक नंदा वसंत बाविस्कर (वय-३३, साळवा) आणि चालक व्ही. व्ही. इंगोले (वय-४०, जळगाव) गंभीर जखमी झाले आहेत. तर, जाकीर शब्बीर खाटीक (वय - ३५, रा. पिंप्री), शब्बीर रहेमुल्ला खाटीक (वय-६५, पिंप्री), गंगाराम आनंदा बाविस्कर (वय -६८, पिंप्राळा), प्रमिला ईश्वर सोनवणे (वय-५०, जळगाव), अनिश हनीफ शेख (वय-३८, चोपडा), सागर विठ्ठल पाटील (वय -२८, रोटवद), भगवान सुपडू पाटील (वय-७५, रा. पिंपळे सिम), जयश्री गणेश मराठे वय-४५, शरद बिलाडिया पारधी (वय-४०, नंदुरबार), विमल रमेश मराठे (वय-६५, नळयात), रमेश सोनू मराठे वय-७५, कमलबाई काशिनाथ मराठे (वय-७५) प्रवीण भगवान कुंभार (वय-२४, गोरगाव), ज्योती योगेश पाटील (वय-३८, साळवा), सुषमा कपिलसिंग बयास (वय-३६, धरणगाव), (केसीएन) मेघना कपिलसिंग बयास (वय ७, धरणगाव), योगेश दिगंबर पाटील (वय-३६, धरणगाव),सुनील रामसिंग अलकारी (वय-५८, जळगाव), अनिता सुनील अलकारी (वय-५२, जळगाव), योगेश दिगंबर पाटील (वय ३६, रा. निंभोरा) २० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातील बसचालकाची प्रकृती गंभीर आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने