गोहामाल पाडा येथे ढोल स्पर्धा रंगली ..
चोपडा,दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील मेलाने येथिल पेसा गाव गोहामाल पाडा येथे ढोल स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमात 150पेक्षा जास्त ढोल सहभागी झाले व होळी दहन सकाळी 4वाजेच्या सुमारास नाना पाटील, गोहमाल पाटील यांच्या हस्ते दहन करण्यात आले.
सकाळी 6 वाजेपर्यंत त्यात टेबल ढोल मध्ये निर्णायक ढोल प्रथम बक्षीस 10000 रुपये डेड्यापाडा येथील ढोलला मिळाले तर तृतीय क्रमांक बक्षीस 5000 धवली पटेल पाडा यांना देण्यात आले. गाड्यातील प्रथम ढोल बक्षीस 10000 रुपये बेलघाट बलवाडी व दुसरा क्रमांक बक्षीस 5000 महाली पाडा यांना गाव पाटील गोहमाल पाडा पोलिस पाटील नाना पाटील यांच्या कडून देण्यात देण्यात आले. यावेळी अनिल पावरा, गोविन्द पावरा रूमा पावरा व सर्व गावातील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
