चोपडा टॅलेंट हंट परिक्षेत उत्साहात 1123 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग..

 चोपडा टॅलेंट हंट परिक्षेत उत्साहात 1123 विद्यार्थ्यांनी नोंदविला  सहभाग..


चोपडा दि.१(प्रतिनिधी): चोपडा टॅलेंट हंट परीक्षेत इयत्ता पहिली, चौथी व सातवीच्या 1123 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावला.    ही परीक्षा दिनांक 1 मार्च रोजी महादेव मंदिर प्रांगणात घेण्यात आली. आयोजन समितीमार्फत सायकल स्मार्टवॉच व स्टडी टेबल अशी अनेक आकर्षक बक्षिसे  विजेत्यांसाठी ठेवण्यात आली आहेत

परीक्षेचे उदघाट्न अडावद सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ यांच्या हस्ते  झाले. परीक्षा आयोजनासाठी  आयडियल इंग्लिश अकॅडमी चे संचालक पद्माकर पाटील , गुरु क्लासेस चे संचालक अश्विनकुमार चौधरी, समर्थ मॅथ्स सायन्स अकॅडमी चे संचालक घनश्याम पाटील, विशाल मराठे, इलियाज पटेल, दिगंबर पाटील, देवराज सर,दिपक पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने