कै हि मो करोडपती माध्यमिक विद्यालयात शिक्षक आर.आर.बडगुजर यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ
चोपडा दि.१(प्रतिनिधी): येथील कै .हि. मो. करोडपती माध्यमिक विद्यालयात दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी ज्येष्ठ शिक्षक श्री राजेंद्र रामनाथ बडगुजर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कर्तव्य पूर्ती स्नेहपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एम आर भोईटे सर होते .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक व उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थिनी यांच्या हस्ते श्री आर आर बडगुजर सर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्नेह वस्त्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या 33 वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करून विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली.
श्री डी वी बाविस्कर, श्रीमती व्हि बी साळुंखे , श्रीमती सी पी बडगुजर ,श्रीमती शर्मिला बडगुजर तसेच माजी विद्यार्थिनी कु. करीना शंभरकर या सर्वांनी श्री आर आर बडगुजर सरांच्या कार्याच्या व विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. श्री आर आर बडगुजर सर यांनी आपल्या मनोगतात संस्था, शाळा सहकारी शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रती कृतघ्नता व्यक्त केली "शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो" असे ते सांगितले .त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री भोईटे सर यांनी श्री आर आर बडगुजर यांच्या विषयी स्नेहभाव व्यक्त केला त्यांच्या सोबत केलेल्या कार्याच्या आठवणीला उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली बडगुजर यांनी केले याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी उपस्थित होते
