वडगावसीम जि.प.शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर*

 वडगावसीम जि.प.शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर 

चोपडा,दि.१(प्रतिनिधी): तालुक्यातील वडगांव सीम येथे शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जि.प.शाळेचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा वडगावसीम येथील शाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. जयश्री पंकज कोळी, श्री. समाधान भिवसन कोळी श्री. दिपक रावसाहेब बाविस्कर व सर्व शा. व्य. समितीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचनल श्री. सुरेश सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालकवर्ग व गावकरी उपस्थित होते. या वर्षी विविध मराठी, अहिराणी हिंदी अश्या गाण्यांवर नाच बसविण्यात आले. सत्कार प्रसंगी पोलिस पाटील तालुका अध्यक्ष गावातील पोलिस पाटील नंदलाल बाविस्कर उपस्थित होते.यासाठी अंगणवाडी सेविका सौ.सपना दिनेश कोळी, सेविका सौ.कविता शशिकांत कोळी श्री सुरेश सोनवणे सर, श्री रोहित निकम सर यांनी मेहनत घेतली. केंद्रप्रमुख सौ. वैशाली ताई प्रविण पाटील गोरगावले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम नियोजनबद्ध व आनंदात संपन्न झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने