अनवर्दे खुर्द येथे भागवत कथा सप्ताह संपन्न

 अनवर्दे खुर्द येथे भागवत कथा सप्ताह संपन्न

चोपडा,दि.१ ( प्रतिनिधी) तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे आज दिनांक 28 रोजी भागवत कथा सप्ताह समारोह सोहळा नुकताच संपन्न झाला असून त्यानिमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

अनवर्दे खुर्द गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विजय अमृतराव बोरसे ,लक्ष्मण संतोष शिरसाट, ज्ञानेश्वर बोरसे, काकासाहेब बोरसे, ह भ प बाळासाहेब महाराज ,भटू महाराज आदींनी पुढाकार घेत विठ्ठल रुक्माई मातेचा पालखी मिरवणूक काढली तसेच गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.नागरीकांनी मोठ्या भक्ती भावाने या परमार्थिक सोहळ्यात हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने