गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने चोपड्यात जल्लोष
चोपडा दि.१५(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या ३९ मंत्र्यांचा दिमाखदार शपथविधी सोहळा नुकताच पार पडला असून श्री.गुलाबराव पाटील यांची कैबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्याबद्दल चोपडा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार हर्षोल्लास साजरा करण्यात आला आहे . श्री.गुलाबराव पाटील यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली त्याबद्दल चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला यावेळी आबा देशमुख, भरत भाऊ देशमुख,विकास पाटील, राजु भाऊ बिटवा, नंदु भाऊ गवळी, फरमान सैय्यद,मजहर सैय्यद,श्री.पालिवाल किरण देवराज आदी उपस्थित होते.