जळगाव जिल्ह्यात गिरीशभाऊ महाजन, गुलाबराव पाटील व संजयभाऊ सावकारे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ.. महाराष्ट्र शासनात ३९ मंत्र्याचा शपथविधी

 जळगाव जिल्ह्यात गिरीशभाऊ महाजन, गुलाबराव पाटील व संजयभाऊ सावकारे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ.. महाराष्ट्र  शासनात ३९ मंत्र्याचा शपथविधी 

मुंबई दि.१५ :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यासाठी ३ जणांच्या लॉटरी लागली असून दोन जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळाली असून एका नव्या चेहऱ्याला संधी प्राप्त झाली आहे.यात जामनेरचे गिरीशभाऊ महाजन,धरणगाव चे गुलाबराव पाटील व भुसावळचे संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.यात अजून भर पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.


मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?


१. चंद्रशेखर बावनकुळे


२. राधाकृष्ण विखे-पाटील


३. हसन मुश्रीफ


४. चंद्रकांत पाटील


५. गिरीश महाजन


६. गुलाबराव पाटील


७. गणेश नाईक


८. दादा भुसे


९. संजय राठोड


१०. धनंजय मुंडे


११. मंगलप्रभात लोढा


१२. उदय सामंत


१३. जयकुमार रावल

१४. पंकजा मुंडे


१५. अतुल सावे


१६. अशोक उईके


१७. शंभूराज देसाई


१८. आशिष शेलार


१९. दत्तात्रय भरणे


२०. आदिती तटकरे


२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले


२२. माणिकराव कोकाटे


२३. जयकुमार गोरे


२४. नरहरी झिरवळ


२५. संजय सावकारे


२६. संजय शिरसाट

२७. प्रताप सरनाईक


२८. भरत गोगावले


२९. मकरंद पाटील


३०. नितेश राणे


३१. आकाश फुंडकर


३२. बाबासाहेब पाटील


३३. प्रकाश आबिटकर


३४. माधुरी मिसाळ


३५. आशिष जैस्वाल


३६. पंकज भोयर


३७. मेघना बोर्डिकर


३८. इंद्रनील नाईक

 ३९. योगेश कदम


दरम्यान, महायुतीच्यामंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने