मिमोसा / क्लारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न
चोपडा दि.१५(प्रतिनिधी): मिमोसा / क्लारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
एन.एफ.ई. मिशन संचलित मीमोसा / क्लारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या निसर्गरम्य भव्य प्रांगणात 14 डिसेंबर 2024 रोजी चोपडा येथे शाळेच्या संस्थापिका क्लारा लाईफ लेरबर्ग यांच्या जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. स्टीफन सपकाळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे पदाधिकारी आदरणीय प्रमोद हिवाळे, निलेश सपकाळे व सिसिल सपकाळे तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वेरोनिका सूर्यवंशी व माध्यमिक विभागाच्या श्रीमती नीलिमा मॅथ्यू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या या वर्षीचे वेगळेपण म्हणजे आजी -आजोबा यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षक म्हणून सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. ए.पी. पाटील सर व कलाशिक्षक श्री संजय नेवे यांनी कामकाज पाहिले, व चित्रकला स्पर्धेमध्ये 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला . या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.