अडावद जवळ आदिवासी इसमाचा खून ?.. श्वान पथकाचे पाचारण मात्र रहस्य गुलदस्त्यात

 

अडावद जवळ आदिवासी इसमाचा खून ?.. श्वान पथकाचे पाचारण मात्र रहस्य गुलदस्त्यात

चोपडा दि.१(प्रतिनिधी)तालुक्यातील अडावद जवळील पाटचारीवरील रहिवासी जगदीश फिंगऱ्या बारेला (40) याचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची भयानक घटना घडली.श्वानपथकाला लागलीच  पाचारण करण्यात आले मात्र खूनामागील नेमके कारण काय ? हे अद्याप समजू शकले नाही.  रहस्य  गुलदस्त्यात असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,  अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर पिर पाखर बाबाच्या दर्याजवळ एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती  अडावद पोलिसांनी  मिळाली त्यावरून त्यांनी परिसर पिंजून काढला असता मयत ईसमाचे नाव जगदीश फिंगऱ्या बारेला (40) असल्याचे निष्पन्न झाले.त्याचा खून कोणी केला असावा  याचा शोध घेण्यासाठी
  जळगावात येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र  हे श्वान जवळपास दर्गाच्या परिसराच्या पलीकडे  जाऊ शकले नाही. मृतदेहाच्या प्राथमिक स्थितीवरून त्याला झालेला जबर मारहाण करूनच त्याचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे . याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
श्वान जंजिरा सोबत ठसे तज्ञ सहायक पोलीस निरीक्षक फड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनरीक्षक गणेश वाघमारे, अनिल जाधव यांचे पथक श्वान जंजीर सोबत हवालदार निलेश झोपे, पोलीस नाईक प्रशांत कंखरे हे उपस्थित होते.
सदर मयत इसम जगदिश फिंगऱ्या बारेला हा गावाच्या उत्तरेकडील हतनुरच्या उजव्या कालव्यावरील डाव्या चारीवर झोपडीत राहत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होता. संपूर्ण कुटुंब शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करीत असे.
घटनेचे गांभीर्य पाहता चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनरीक्षक राजू थोरात, हवालदार भरत नाईक, दिनेश चव्हाण, गृह रक्षक दलाचे जवान संजय पवार, अमोल हिवाळे, चंदू कोळी, मनोज महाजन, किरण महाजन यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मृत देहाजवळ एम. पि. 46 एम.एल. 6889 क्रमांकाची दुचाकी लावलेली आढळली. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने