मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणेसाठी मुख्याधिकारींनी ज्येष्ठांना केले मार्गदर्शन व फॉर्म वाटप

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणेसाठी मुख्याधिकारींनी ज्येष्ठांना केले मार्गदर्शन व फॉर्म वाटप 

चोपडा दि.१(प्रतिनिधी) :येथील जेष्ठ नागरिक संघाचे कार्यालयात  दि.२९ ऑगस्ट दुपारी ३ वाजता न .प .  मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी  वृद्धापकाळ सुखकर होणेसाठी वय वर्ष पूर्ण 65 किंवा त्या वरील जेष्ठ नागरिकांना आवश्यक उपकरण /साधन, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिकव्हील चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि- ब्रेस, लम्बर बेल्ट, सवाईकल कॉलर इत्यादी खरेदी साठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ मिळणे बाबत योजनेचा  फॉर्म कसा भरवा याचे मार्गदर्शन करून उपस्थित जेष्ठ नागरिकांना त्यांचे हस्ते कोरे फॉर्म वाटप करण्यात आले. व फार्म भरले नंतर पात्र लाभार्थीना  वर्षातून एकदा शासन कडून  थेट त्यांचे खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे  ₹ ३०००/- पर्यंत अनुदानाचा लाभ मिळेल. असे सांगितले. यावेळी न पा अधिकारी कर्मचारी दीपाली साळुंखे,व्ही .के पाटील,जयेश भोंगे,किशोर पवार यांनीही उपयुक्त माहिती दिली.

यावेळी जिल्हा फेसकॉम संघटक सचिव प्रमोद डोंगरे, ज्येष्ठ नागरिक संघ चोपडा अध्यक्ष -  जयदेव देशमुख व सचिव  विलास पाटील, उपाध्यक्ष  जिजाबाराव नेरपगारे, कोषाध्यक्ष दिलीपराव पाटील, सहसचिव अभि. विलास पाटील, कार्यकारणी सदस्य गोकुळ पाटील , परशुराम पेंढारकर, सुभाष  पाटील, शांताराम पाटील, बाविस्कर, रितेश निकम, ए  टी पाटील मुख्याध्यापक, श्री जोशी,चंद्रशेखर पाटील,  मधुकर बाविस्कर, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य करोडपतीसर, सुभाष पाटील,शिरीष गुजराथी, सुबोध गुजराथी, उपस्थित होते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने