परसोडे शेतकरी सुपुत्री विद्या झाली पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक

 परसोडे शेतकरी सुपुत्री विद्या झाली पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक      

♦️ अभ्यास, कष्ट, परिश्रम, व जिद्दीमुळेच यश शक्य--- विद्या जाधव

धरणगाव,दि.८(प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील परसोडे येथील प्रगतिशील शेतकरी श्री नंदलाल भास्कर जाधव यांची सुपुत्री विद्या हीने दादासाहेब रावल कॉलेज दोंडाईचा इथे बी  एस स्सी (मॅथेमॅटिक्स) पदवी पूर्ण केल्या  नंतर स्पर्धा परीक्षा एम पी एस सी चा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये प्रवेश घेतला.  विद्या हीने  मोठया  जिद्दीने, परिश्रमाने, चिकाटीने अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा उत्तीर्ण करून गावाचा व तालुक्याचा मान उंचावला आहे.

 लहानपणापासून कुशाग्र बुध्दीमत्ता व नम्र असलेली विद्या भविष्यात उतुंग यश मिळवेलच याची शाश्वती सर्वांना होती. प्रतिकूल परिस्थितीत तीने यशोशिखर गाठल्याने परसोडे व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.तिला या यशात उमेश कुदळे, महेश पाटील , उत्तम पवार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्या हीने उज्वल यश संपादन केल्याबद्दल तिचे पंचक्रोशीतील नागरिकांनी, माता-पिता, मित्र परिवाराने यांनी तिचे खूप खूप अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच भगवती मेडीलकल सोनवद ता. धरणगाव चे भाऊसाहेब पाटील, व  प्रेमराज पाटील, डॉ. नितीन पाटील, चंद्रशेखर भाटिया, बाळू आबा पाटील, दिलीप आण्णा धनगर, उज्वल पाटील, पत्रकार विकास पाटील या सर्वांनी विद्या हीने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या यशाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी, कार्यासाठी समस्त नागरिकांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने