बीआर एस पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा कोमलताई पाटलांकडून वसतीगृहास १० खुर्च्या भेट

 बीआर एस पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षा कोमलताई पाटलांकडून वसतीगृहास १० खुर्च्या भेट

चोपडा दि.९(प्रतिनिधी):येथील कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे  वसतीगृहास आदिवासी दिनानिमित्त आज दिनांक ९ ऑगस्ट रोजी बीआरएस पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.कोमलताई पाटील यांनी    १०खुर्च्या भेट म्हणून दिल्या आहेत.

मागासवर्गीय आदिवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थींनींचे  शैक्षणिक भवितव्य उद्धारासाठी काही संस्था तीळ तीळ झिजत आहेत त्यांना समाजातील प्रगत समाजाने पुढे येऊन आर्थिक हात देणे नितांत गरजेचे असल्याचे विचार डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आदिवासी दिनाचे औचित्य साधत १० खुर्च्यांची मदत केली आहे. भविष्यात विद्यार्थीनींना जी काही मदत करता येईल ती आवश्य करीन असे आश्वासन त्यांनी दिले.

  यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे चोपडा विधानसभा प्रमुख  समाधान बाविस्कर , वस्तीगृह अध्यक्ष  महेश शिरसाठ, तालुका महीला आघाडीच्या अनिता जाधव,तेजश्री पाटील ,अधिक्षिका कावेरी कोळी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने