माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते गणपुरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश


माजी आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते गणपुरच्या तरुणांचा शिवसेनेत प्रवेश 

चोपडा,दि२०( प्रतिनिधी )चोपडा विश्रामगृह येथे माजी आ. प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते गणपूर येथील कार्यकर्त्यांचा दणक्यात शिवसेनेत प्रवेश झाला . तरुण तडफदार प्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये नितीन रामसिंग सोनार, प्रमोद विनायक पाटील, राहुल राजेंद्र सोनवणे, गौरव पाटील, किशोर प्रवीण पाटील, जयेश किशोर पाटील, प्रणव राजेंद्र पाटील, मोहित किशोर पाटील, मनीष पाटील, केतन सतेर, निलेश वानखेडे  यांचा समावेश आहे.यावेळी सोबत नरेंद्र पाटील (सभापती कृ. उ. बा. स चोपडा), गोपाल पाटील, विकास पाटील,(माजी उपासभापती एम.व्ही पाटील सर,ए. के गंभीर सर, कुणाल पाटील, विजय पाटील, कैलास बाविस्कर आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने