आपले गडकोट आपला अभिमान : पंकज शिंदे

 आपले गडकोट आपला अभिमान : पंकज शिंदे

♦️रोटरी क्लब तर्फे दुर्गसंवर्धनावर व्याख्यान संपन्न 

चोपडा,दि.२० (प्रतिनिधी) आपले गडकोट आपला अभिमान असून आपण त्यांचा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. आपल्या गडकोटांनी एकेकाळी आपले स्वराज्य टिकवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. आज मात्र हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून आपण दुर्ग संवर्धनासाठी हातभार लावायला हवा असे आवाहन प्रताप विद्या मंदिराचे उपशिक्षक तथा दुर्गसेवक पंकज शिंदे यांनी केले.रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या वतीने आयोजित व्याख्यानात "वसा दुर्गसंवर्धनाचा : ठसा दुर्ग स्थापत्याचा" या विषयावर ते बोलत होते.

        प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील इतिहास शिक्षक पंकज शिंदे यांचा यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडा च्या वतीने सन्मान करण्यात आला.     प्रस्ताविकातून रोटरीचे अध्यक्ष प्राचार्य ईश्वर सौंदाणकर यांनी रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. रोटरीचे सचिव रोटे बी एस पवार यांनी वाढदिवस असणाऱ्या रोटेरियन बंधू-भगिनींचे अभिष्टचिंतन आणि उपस्थिताचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहसचिव रोटे संजय बारी यांनी केले. यावेळी रोटरीचे कोषाध्यक्ष रोटे प्रदीप पाटील यांच्यासह सर्व रोटेरियन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने