33 वर्षाच्या कालखंडानंतर भेटले माजी विद्यार्थी ..अन् अनेक आठवणींचा फुटला बांध..

 

33 वर्षाच्या कालखंडानंतर भेटले माजी विद्यार्थी ..अन् अनेक आठवणींचा फुटला बांध..

चोपडा,दि.१९ (प्रतिनिधी)   शहरातील  प्रताप विद्यामंदिर येथील सन 1991 ते सन 1992 यावर्षी बारावी सायन्सला शिकत असलेले विद्यार्थी 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर एकत्रित येत हॉटेल योगानंद येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्नेह मेळा संपन्न झाला.यावेळी केवळ विद्यार्थी च नव्हे तर त्यावेळचे प्राध्यापक वृंद सहभागी झाल्याने कार्यक्रमात चांगलीच रंगत वाढली.असा दूर्मिळ योग पुन्हा यावा  हा विचार पुढे येऊन मंगळग्रह मंदिरावर दुसरा कार्यक्रम घेण्याचा संकल्प करण्यात आला.



यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर एस बी कुलकर्णी, सेवानिवृत्त प्राध्यापक ए डी माळी, सेवानिवृत्त प्राध्यापक एच ए पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक आर ए पाटील ,दोंडाईचा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी एस लोहार, सेवानिवृत्त प्राध्यापक एस एस जैन, सध्या प्रताप विद्या मंदिराचे प्राचार्य पद भूषवत असलेले श्री गुजराती सर, प्राध्यापक डी एस पाटील यांच्या सह जवळपास 23 विद्यार्थी उपस्थित होते हा अनोखा सोहळा अत्यंत आनंदमयी वातावरणात पार  पडला.प्रसंगी
प्राध्यापक डॉक्टर एस बी कुलकर्णी यांच्या सत्कार दिलीप चिंचोरे यांनी, प्राचार्य डॉक्टर पी. एस. लोहार यांच्या सत्कार राजेश चौधरी सर यांनी प्राध्यापक डॉक्टर आर. ए. पाटील यांच्या सत्कार नरेंद्र पाटील यांनी प्राध्यापक एस एस जैन यांच्या सत्कार नितीन पाटील सर यांनी प्राध्यापक येथे पाटील सर यांच्या सत्कार देवराज पाटील यांनी तर प्राध्यापक ए डी माळी व प्रताप विद्या मंदिराचे प्राचार्य श्री गुजराती सर यांच्या सत्कार जयराम कोळी यांनी केला‌. कार्यक्रमात प्राध्यापकांनी त्यांचे अनुभव व मार्गदर्शन केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सध्या आपण काय करीत आहोत यासंदर्भात माहिती दिली .प्रताप विद्या मंदिरात सुरू असलेल्या या एग्रीकल्चर सायन्स या युनिटने उतुंग अशी भरारी घेतलेली असून असंख्य विद्यार्थी प्रशासकीय सेवेत चमकत आहेत
कार्यक्रमात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर सातपुड्याच्या कुशीत असलेल्या गुळ नदीवर असलेल्या मालापूर डॅम वर फेरफटका मारण्यासाठी सर्व सर्व विद्यार्थी मित्रांच्या मोर्चा वळला मालापूर धरण येथे सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांची हितगुज आपसूक माहिती घेतली यावेळी मनोरंजनाचा देखील मनमुराद आनंद लुटला 33 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर देखील सर्व शिक्षक आणि बहुतांश विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलन घडवून आणले त्यात नितीन पाटील विशेष शिक्षक कल्याण महानगरपालिका ,योगराज पाटील उद्योजक अंकलेश्वर, दिलीप चिंचोरे कार्यालय अधीक्षक पंचायत समिती भडगाव, सुधाकर निकम उद्योजक अंकलेश्वर ,वसंत बोरसे उद्योजक पुणे, जयराम कोळी पत्रकार चोपडा ,प्रवीण पाटील कला शिक्षक नीलकंठेश्वर शिक्षण संस्था चावलखेडा, लक्ष्मण पाटील कृषी व्यावसायिक तावसे ,सोपान पाटील आश्रम शाळा पारोळा, नरेंद्र पाटील मेडिकल एजन्सी व सरपंच गांधली तालुका अमळनेर, सुभाष सोनवणे उपशिक्षक नवी मुंबई ,संतोष पाटील शेती निमगव्हाण ,पद्माकर पाटील शेती आडगाव ,शांताराम पाटील पंचायत समिती धरणगाव, सुखदेव राज कुळे चोपडा ,डॉक्टर फिरोज अहमद चोपडा ,माणिक पाटील कृषी व्यावसायिक घाडवेल, उमेश पाटील फोटोग्राफी मामलदे, विकास पाटील शेती गाढोदा, राजेश चौधरी शिक्षक साने गुरुजी विद्यालय वडती ,दीपक अहिरे आरोग्य विभाग महानगरपालिका जळगाव ,अजय जोहरी व्यावसायिक चोपडा ,इत्यादी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भाग घेतला व पुढील स्नेहसंमेलन संपूर्ण परिवारासह मंगळ ग्रह मंदिर अंमळनेर येथे घेण्यात यावे असे  सर्वानुमते ठरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने