विष्णापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल किट दप्तर वह्या बिस्कीट वाटप

 विष्णापूर येथील जि. प. प्राथमिक शाळेत  विद्यार्थ्यांना स्कूल किट दप्तर वह्या बिस्कीट वाटप

चोपडादि.१८(प्रतिनिधी) तालुक्यातील विष्णापूर येथील जिल्हा परिषद शाळा विष्णापूर ता. चोपडा येथे ग्रीनस्टार फर्टीलायझर्स लिमिटेड व स्पीक फर्टीलायझर लिमिटेड कंपनीद्वारे शाळेतील चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल किट दप्तर वह्या बिस्कीट पुढे वाटप करण्यात आले. दप्तर व वह्या कंपनीचे प्रतिनिधी श्री प्रवीण बागुल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जळगाव जिल्हा व कंपनीचे अधिकृत विक्रेता आशिष कृषी सेवा केंद्र चोपडा, अग्रवाल ट्रेडिंग कंपनी चोपडा, अजिंक्य सेल्स कॉर्पोरेशन चोपडा यांचे प्रोप्रायटर यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना  वही व दप्तर वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील खालील सदस्य उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील व श्री हिरालाल पेंढारे ग्रामपंचायत विष्णनापूर मा. उपसरपंच सतिलाल धनगर ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील अंकुश माळी उदयभान इंगळे उपस्थित होते. शाळेतील मुख्याध्यापक श्री मनीलाल पाटील सर यांनी आलेल्या मंडळींचे स्वागत केले. श्री संदीप  महाजन सर यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने