महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन


चोपडादि.२०(प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब व भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय आणि कला, वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण घेत असतांनाच केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? यासंदर्भात आयोजित मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

 समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या विशेष मार्गदर्शन सत्रात द युनिक अकॅडमी पुणे च्या जळगाव शाखेचे मार्गदर्शक विकास गिरासे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पदवी काळातच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष रोटे. प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख धृमिल अग्रवाल, सहसचिव संजय बारी, व्ही. एस. पाटील, व्ही. पी. पाटील, युनिक अकॅडमीचे नरेंद्र पाटील तसेच या मार्गदर्शन सत्राचे समन्वयक प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे व समाधान सोनवणे हे मंचावर उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल निकम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. उत्तम सोनकांबळे यांनी मानले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विकास गिरासे यांनी सांगितले की, सातत्य आणि चिकाटी या दोन गुणांच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येते. स्पर्धा परीक्षांबाबत असलेले अनेक गैरसमज दूर करत असताना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे टप्पे, विविध जागांचे प्रकार, त्यासाठी घ्यावयाची काळजी, करावयाची तयारी, आरक्षण, अभ्यासक्रम, अवांतर वाचन, दैनंदिन जागतिक घडामोडींचा अभ्यास, लेखन कौशल्य, विविध घटना संदर्भात असलेली स्वतःची जाण व मते, निर्णयक्षमता इ. संदर्भात मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने