माझा लाडका बाप्पा सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

माझा लाडका बाप्पा सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण 

शिंदखेडा दि.२०(प्रतिनिधी)शहरात माजी नगरसेवक सुरज देसले मित्र परिवाराच्या वतिने माझा लाडका बाप्पा घरगुती गणेशोत्सव सजावट(आरास) स्पर्धा-2024 च्या विजेत्याच पारितोषिक वितरण करण्यात आलं.घरो घरी जावुन प्रत्यक्ष विजेत्याना सह पालकांच्या समवेत पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्रथम पारितोषिक उदय विनायक मराठे,द्वितीय पारितोषिक स्वामी कमलेश देसले,तृतीय पारितोषिक करण महेंद्र पाटील याना देण्यात आलं.यावेळी माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले,विनायक मराठे,उमाकांत देसले,महेंद्र पाटील,राहुल जोशी,कांतिलाल शिंपी,सुनील वाणी,भुपेंद्र भदाने,आबा धोबी,संदीप पाटील,कुणाल देसले,अक्षय वाणी,दर्शन सोनवणे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने