शहीद जवान अरूण बडगुजर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


शहीद जवान अरूण बडगुजर  यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

चोपडा,दि.11 (प्रतिनिधी) : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय 42) हे त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज सकाळी चोपड्यात आणण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देत त्यांच्यावर चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 *शहीद जवान अरूण बडगुजर यांना अखेरचा निरोप* 

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय 42, रा. साई बाबा कॉलनी, चोपडा) हे सोमवारी 9 सप्टेंबर रोजी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. अरूण बडगुजर हे गेल्या 20 वर्षांपासून 105 बीएसएफ बटालियन (सीटी / जीडी) मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. दरम्यान, आज येथून बीएसएफच्या वाहनाने चोपड्यात आणण्यात आले. यानंतर त्यांना अखेरचा देण्यात आला.

 चोपड्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -

शहीद जवान अरुण बडगुजर यांचे पार्थिव आगरतळा येथून बंगळूरूमार्गे आज रात्री मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोहोचले. यानंतर त्यांचे पार्थिव बीएसएफच्या वाहनाने आज सकाळी चोपडा येथे आणण्यात आले. दरम्यान, मोठ्या शोकाकूल वातावरणात शहीद जवान अरुण बडगुजर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने