बापरे बाप..! भर दुपारी ८वी च्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार ..मक्याच्या शेतात साधला डाव ..चोपडा तालुक्यातील घटना


बापरे बाप..! भर दुपारी ८वी च्या  अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार ..मक्याच्या शेतात साधला डाव ..चोपडा तालुक्यातील घटना 

चोपडा दि.२५(प्रतिनिधी)तालुक्यातील एका गावात आदिवासी समाजातील १२वर्ष ८ महीने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर  भर दिवसा अत्याचार केल्याची घटना घडली अत्याचारीने उलटपक्षी जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून पोलिसांनी त्यास हतकडीत अडविले आहे.

आरोपीचे नाव सौरव महेंद्र पाटील असे असून तो चोपड्या पासून ५ते ७किमी अंतरावरील गावातील रहिवासी आहे.त्याने आपल्या ताब्यातील मोटारसायकलवर पिडीतेचा हात पकडून बसवून घेऊन जात गावातील शाळे जवळील मक्याचा शेतात सदरील बारा वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार केला. व कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.२०२३ चे कलम ६४(१), ३५१ (२) (३), तसेच अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम १९८९ चे कलम ३(१)(W)(i)(ii), ३(२) (v) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून  अटक करण्यात आली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने