महाजन क्लासेसने केले आगळेवेगळे रक्षाबंधन ..अनाथ बालकांना बांधल्या राख्या

 महाजन क्लासेसने केले आगळेवेगळे रक्षाबंधन ..अनाथ बालकांना बांधल्या राख्या

चोपडा,दि.२४(प्रतिनिधी): येथील 'महाजन इंग्लिश क्लासेस'मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही   'अनाथांची ' नाथ बनून  क्लासेसच्या विद्यार्थींनींकडून वेले आश्रमातील अनाथ  विद्यार्थ्यांना राख्या बांधून आगळेवेगळे  रक्षाबंधन साजरा करुन  समाजहित जोपासन्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.           

बहिण-भावांच्या 'रक्षाबंधनाचा पवित्र  सण" असूनही जे मुले  घरापासून दूर, अनाथ आहेत.ते या बंधनास मुकू नयेत व त्याचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी  क्लासमधील ३री,५वी,६वी ,७वी च्या विध्यार्थीनीना घेऊन दीपक महाजनसरांनी वेले आश्रमात जाऊन  'रक्षाबंधन' साजरा केले.

यावेळी व्यवस्थापक  शेषराव पाटील यांनी  विदयार्थीनीना वृद्धाश्रम, गोशाळा, वेदांत गुरुकुल, बायोगॅस यासंबंधी सविस्तर माहीती दिली तसेच संस्थापक अध्यक्ष  चंद्रकांत आण्णा पाटील यांनी देखील  संस्थेमार्फत चालणाऱ्या सर्व उपक्रमांची माहीती दिली.संस्थेने या उपक्रमाबद्दल क्लासेसचे आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने