कुरवेल माध्यमिक विद्यालयात ४३० गरीब गरजू विद्यार्थिनींना वह्या वाटप

 कुरवेल माध्यमिक विद्यालयात ४३० गरीब गरजू विद्यार्थिनींना वह्या वाटप 

चोपडा दि.२३(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील माध्यमिक विद्यालयात ४३० गरीब गरजू विद्यार्थिनींना ९ ऑगस्ट जागतिक क्रांतीदिवस व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून वह्यावाटप करण्यात आल्या. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन व केंद्रीय क्रीडा, युवक कल्याण मंत्री ना. रक्षाताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चातर्फे अनुसूचित जमाती विभाग जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांच्या माध्यमातून कुरवेल येथील माध्यमिक विद्यालयात ४३० गरीब गरजवंत विद्यार्थिनींना वह्या वाटप करून मोलाचा हात देण्यात आला आहे. 

या उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील आदिवासी पाड्या वस्ती व जि.प. शाळांमधील ३० हजार अनुसूचित जमातीच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा वाटा उचलण्यात आला आहे. त्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला. ९ ऑगस्ट जागतिक क्रांतीदिवस व आदिवासी दिवसाचे औचित्य साधत हा स्तूत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनेउपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने