जातीय शिरगणती करून 50 टक्के आरक्षण मर्यादा उठवा म्हणून २४ऑगस्ट ला चोपडा येथे परिषद

 

जातीय शिरगणती करून 50 टक्के आरक्षण मर्यादा उठवा म्हणून  २४ऑगस्ट ला चोपडा येथे परिषद

चोपडादि.२४(प्रतिनिधी):बिहारमध्ये जातीय जनगणना झाली. नंतर आरक्षण मर्यादा वाढवली परंतु  मा सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाचे मर्यादा घालून ठेवलेली आहे.ती वाढवली नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या देशात पशुपक्षी यांची शीरगणती झालेली आहे. परंतु मोदी सरकार  चार वर्षापासून जातवार जनगणना ला  विरोध करीत आहेत महाराष्ट्रात आणि भारतात अशा बऱ्याच जाती आहेत की त्यांची विकासाच्या बाबतीत फरपट होत आहे बऱ्याच जाती वाऱ्यावर आहेत . त्यातच सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षणाचे मर्यादा घालून दिलेली आहे . आणि महाराष्ट्र सरकार  मोघम पणे सामाजिक विकासाच्या प्रश्नावर काम करीत आहे व ती मोठ्या जन्संख्यावर अन्याय कारक आहे.म्हणून जातीय शिरगणती व त्यानुसार सर्वांना सामाजिक आर्थिक विकासात हक्काचा वाटा  मिळणे जरुरीचे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातवार गणनेला त्यांच्या विचारातून मान्यता दिलेली आहे. तरी ही ५०% मर्यादा उठवा या मागण्यांसाठी भाकप माकप  पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर चोपडा येथे  आज धनगर वाडा समाज मंदिर मध्ये या विषयावर चर्चा व निर्णय घेनेसाठी परिषद घेण्यात आलेली आहे*.
या परिषदेचे उद्घाटन डॉक्टर नरेंद्र शिरसाट हे करणार असून
  श्री श्रावण देवरेआयु .जयसिंग वाघ जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी  डॉ आयुब पिंजारी, डॉ रुस्तुम तडवी ,कॉ.  जे.डी ठाकरे जळगाव,श्री पुंडलिक महाजन,
डॉ आशिष बडगुजर ,डी पी साळुंखे ,संजीव शिरसाठ पत्रकार (सामाजिक कार्य करते ),माजी नगरसेवक सुरेश शिरसाट,
मुजाद तडवी यांची राहणार आहे
  तरी सर्व समाज घटकांनी/ नागरिकांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन जातीय शिरगणती लढा संघर्ष समिती तर्फे कॉ. अमृत महाजन( निमंत्रक ) कॉ. लक्ष्मण शिंदे, वासुदेव कोळी, भास्कर सपकाळे  शांताराम पाटील,वाल्मीक मैराले सुशीला बाई  भिल्ल, ,गणेश महाजन, ,अशोक बाविस्कर ,नगो भिल, सरफराज शाह कौतिक कोळी , गुरुदास मोरे, कॉ. गोरख वानखेडे  आयु.संजय अहिरे, जाविद तडवी साजिद टेलर लखिचनद बाविस्कर, बाळू लोहार,भरत कोळी,बळीराम धीवर काळू कोळी अरमान तडवी संतोष कुंभार संजय महाजन अम्बालाल राजपूत, विश्वास साळुंखे,गुलाब कुरेशीआदींनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने