जळगाव जिल्ह्यातील भाविकांची बस नेपाळमध्ये दरीत कोसळून १४ यात्रेकरु ठार,३०गंभीर जखमी.. प्रवासातील यात्रेकरू कोणाचे नातेवाईक असल्यास वाचा नावे..

 

जळगाव जिल्ह्यातील भाविकांची बस नेपाळमध्ये दरीत कोसळून १४ यात्रेकरु ठार,३०गंभीर जखमी.. प्रवासातील यात्रेकरू कोणाचे नातेवाईक  असल्यास वाचा नावे..

चोपडा दि.२३(प्रतिनिधी): नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस युपीच्या नेपाळमध्ये नदीत कोसळली. या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला वेग देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. दरम्यान, बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडा जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली.
या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह १४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पशुपती नाथ मंदिराच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस नेपाळ मधील नदीत कोसळल्याने जळगाव जिल्ह्यातील जवळपास ३० भाविकांची हृदयद्रावक मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली.
   तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात मार्त्यांगडी नदीमध्ये ही बस कोसळून दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात आपल्या जळगांव जिल्ह्यातील वरणगांव, तळवेल व भुसावळ परीसरातील १४ भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते तसेच अनेक भाविक जखमी झाले आहेत. भारत सरकारची नेपाळ मधील दूतावास यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली जात असून सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र मृतांचा आकडा अधिकृत पणे कळालेला नसून कमी जास्त होण्याची शक्यता असल्याची माहिती मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी वृत्त प्रतिनिधींशी बोलताना दिली. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनीही संपर्क साधून माहिती घेतली आहे.त्यात बस मध्ये एकुण ४३भाविक असून ३८ जणांची ओळख पटली आहे तर ५जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.बसचे टायर फुटून ही बस ३०० फुट दरीत कोसळली आहे.हे सर्व यात्रेकरू महाराष्ट्राचे आहेत.

*अपघातातील भाविकांचे नावेआली समोर*
अनंत ओंकर इंगळे, सीमा अनंत इंगळे, सुहास राणे, सरला राणे, चंदना सुहास राणे, सुनील धांडे, निलीमा सुनील धांडे, तुळशीराम तायडे, सरला तुळशीराम तायडे, आशा समाधान बाविस्कर, रेखा प्रकाश सुरवाडे, प्रकाश नथू सुरवाडे, मंगला विलास राणे, सुधाकर बळीराम जावळे, रोहिणी सुधाकर जावळे, विजय कडू जावळे, सागर कडू जावळे, भरती प्रकाश जावळे, संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्णी संदीप सरोदे, हेमराज राजाराम सरोदे, रुपाली हेमराज सरोदे, अनुप हेमराज सरोदे, गणेश पांडुरंग भारंबे, मूलभा पांडुरंग भारंबे, मिलन गणेश भारंबे, परी गणेश भारंबे, शारदा सुनील पाटील, रुमुदिनी रवींद्र भारंबे, शारदा सुनील पाटील, निलीमा चंद्रकांत जावडे, ज्ञानेश्वर नामदेव बोन्डे, आशा ज्ञानेश्वर बोन्डे, आशा पांडुरंग पाटील, पंकज भागवत भंगाळे, वर्षा पंकज भंगाळे, प्रवीण पांडुरंग पाटील, अविनाश भागवत पाटील, अनिता भागवत पाटील, मुर्तिजा (ड्रॉयव्हर, पूर्ण नाव माहित नाही), रामिजल (कॅन्डक्टर, पूर्ण नाव माहित नाही) असे बस अपघातील भाविकांचे नावे आहेत.
नेपाळ मधील लष्कराचे मदतीसाठी धावून आले आहेत.जोमाने कार्य सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने