चोपड्यात रिक्षाचालकांच्या पाल्यांना ७००वह्या मोफत वाटप
चोपडादि.१७ ( प्रतिनिधी)चोपडा शहरातील गरीब रिक्षाचालक बांधवांच्या मुलांना थोडाफार मदतीचा हातभार लागावा या उदात्त हेतूने भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत वह्या वाटप कार्यक्रम केला.यात ७००वह्या वाटप झाल्याने गरजू पाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मगन बाविस्कर सर भाजपा यावल प्रभारी प्रदिप पाटील ,शहर सरचिटणीस दिपक बाविस्कर, उपअध्यक्ष भरत बाविस्कर ,सरचिटणीस विजय बाविस्कर, उपअध्यक्ष नंदलाल धनगर यांच्यासह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.