जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर साजरा करणे "Tourism & Peace"घोष वाक्य घोषित

 जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर   

रोजी साजरा  होणार "Tourism &

Peace"घोष वाक्य घोषित 

   

   जळगाव दि. 17 ( प्रतिनिधी ) –  सालाबादप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिन 2024 साजरा करत असून, युनाटेड नेशन टुरिझम (UN TOURISM ) यांचेद्वारे सन 2024 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य Theme" Tourism & Peace" हे घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोटक्लब येथे       २७ सप्टेंबर, २०२४ रोजी पर्यटन दिनाचे औचित्य साधत पर्यटनाशी निगडित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत पर्यटन दिन साजरा करणार आहे.

पर्यटन दिना निमित्त खालील उपक्रम खालील प्रमाणे-

            1. प्रादेशिक कार्यालय नाशिक मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवादाचे (MTDC World Tourism Day Seminar) आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता अति महत्वाच्या माननीय व्यक्ती नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ञ व पर्यटन व्यावसायिक टुर ऑपरेटर्स, सहल आयोजक, टुर्स असोसिएटस, हॉटेलियर्स, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योजक, विद्यार्थी, निवास व न्याहारी इ. यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी सर्वाना सदर कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवहान करण्यात  आहे.

2. पर्यटन दिना निमित्त विविध स्पर्धाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थीनी सदर स्पर्धेत आर्वजुन सहभाग घ्यावा. तसेच, सदर स्पर्धा ही महाविद्यालयांनी आपआपल्या विद्यालयातच घ्यावायची आहे. व स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थीमार्फत काढण्यात आलेले चित्र व निंबंध या कार्यालयाकडे २० सप्टेंबर, २०२४ पर्यत जमा करावेत. दोन्ही स्पर्धेतून पात्र विद्यार्थीना प्रथम . द्वितीय, तृतीय पारितोषीक बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळा हा २७ सप्टेंबर, २०२४  रोजी उपस्थितांत मान्यवराच्या हस्ते देण्यात येणार आहे.

निबंध स्पर्धेचे विषय व पारितोषकांचे स्वरुप खालील प्रमाणे.

निबंधाचे विषय

१. पर्यटन - शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता,  महाराष्टाची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश,  माझ्या स्वप्नातले पर्यटन,  भारत व पर्यटन शांततेचे दूत आणि प्रतिक

प्रथम पारितोषिक -  पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 2 रात्री 3 दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत),  द्वितीय पारितोषिक -  पर्यटक निवासात 2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत)

तृतीय पारितोषिक  - जवळच्या पर्यटक निवासात व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस् + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह

चित्रकला स्पर्धेचा विषय व पारितोषकांचे स्वरुप खालील प्रमाणे. चित्रकलेचे विषय

* जागतिक पर्यटन दिनाचे औचित्या साधुन आपण "Tourism & Peace" या घोषवाक्याशी अधीन राहून चित्रकलेचे विषय असतील.

प्रथम पारितोषिक - पर्यटक निवासात 2 व्यक्तीना 2 रात्री 3 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत)  व्दितीय पारितोषिक – पर्यटक निवासात  2 व्यक्तींना 1 रात्र 2 दिवस राहण्याची व्यवस्था प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (नाशिक विभागातील पर्यटक निवासांत) तृतीय पारितोषिक - जवळच्या पर्यटक निवासात 2 व्यक्तीना 1 दिवस राहण्याची व्यवस्थ + दुपारचे जेवण + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह

 महामंडळाच्या पर्यटक निवासांच्या माहितीपत्रकांचे विमोचन उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते करण्यात येणार आहे.

निबंध व चित्रकला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थीनी त्यांचे निबंध व चित्र या कार्यालयाकडे 20 सप्टेंबर, 2024 पर्यंत जमा करावी.

            कार्यालयाचा पत्ता- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन भवन गडकरी चौक प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने