ग्रामपंचायत कर्मचारींचे अनेक प्रश्न चर्चेत मार्गी.. कॉ.अमृतराव महाजन यांची माहिती

 ग्रामपंचायत कर्मचारींचे अनेक प्रश्न चर्चेत मार्गी.. कॉ.अमृतराव महाजन यांची माहिती


चो
पडादि.१३(प्रतिनिधी).. मुंबई येथे.दिनांक 11/09/2024 रोजी ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या सेवा सदन निवासस्थानी मीटिंग घेण्यात आली त्यात सांगण्यात आले  ग्रामविकास विभाग ने जिल्हा परिषदांना 5 सप्टेंबर रोजी 200 कोटी दिले तसेच  15मे 24ला 243 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. ते कर्मचाऱ्यांपर्यंत वितरित करण्याची कारवाई सुरू आहे येत्या दोन दिवसांत पगार होतील. व लवकरच 19 महिन्याच्या किमान वेतनाचा फरक मिळेल अशी माहिती  नामदार गिरीश महाजन यांचे पीए श्री देशमुख  यांच्या मध्यस्थीने घेण्यात आलेल्या ग्राम विकास विभागाचे सचिव ,उपसचिव अधिकारी यांचे व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी यांचे झालेल्या चर्चेनंतर झाले अशी माहिती महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे

 याबाबत सविस्तर असे की, या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चर्चा करण्यात आली यात ठरलेली असे की.१). यावलकर समिती च्या अंमलबजावणी साठी जिल्हा परिषद कडुन 8 दिवसांत अहवाल मागविण्यात येईल निशिक वगळता तात्काळ कारवाई करण्याचे पत्र जिल्हा परिषद ला पाढविण्यात येईल व  अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल.२) कर्मचाऱ्यांच्या पगाराचे अनुदानासाठीवसुलीची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.३). किमान वेतन समिती गठीत करण्याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभाग कडे तात्काळ कळविण्यात येईल.४) अनुकंपा तत्त्वावर रिक्त जागेवर ग्रामपंचायत कर्मचारी याची भरती करण्याबाबत विचार व अभ्यास करून निर्णय करण्यात येईल.५) लोकसंख्येची जाचक अट कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न  आहे. व नवीन आकृतीबंध बाबत माहिती मागवलेली आहे ६) राहणीमान भत्ता ग्रामनिधीतून द्यावा म्हणून ग्रामपंचायतींना कलम 154 खाली सूचना देण्यात येतील तो शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतून द्यावा याबाबत सरकार सकारात्मक आहे 

वसुलीची अट रद्द करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह आहे  परंतु वित्त खात्याने निगेटिव रिमार्क दिलेला आहे. हा प्रश्न मंत्रिमंडळासमोर ठेवावा.  निर्णय घेण्यात आला  विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत उपसचिव. त्यांचे स्विय सहायक देशपांडे तसेच ग्रामपंचायत विभागाचे मुख्य सचिव श्री गांगुर्डे , आवर सचिव श्रीमती .शेटे... व उपसचिव .पांढरे, निकुंभ...तसेच महासंघाचे राज्य सचिव का, नामदेव चौहान, सखाराम दुगूडे, मंगेश म्हात्रे,अमरूत महाजन, गोविंद म्हात्रे, चत्रुगण लांजेवार, उज्वल गांगुर्डे,शाम चिचने,विनोद तोर, उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने