चोपड्यात पाचव्या दिवशी "गणरायाला" धुम धडाक्यात निरोप..शहर गुलाबी

 चोपड्यात पाचव्या दिवशी "गणरायाला" धुम धडाक्यात निरोप..शहर गुलाबी

♦️ ..पोलिसांची कसब पणाला ..चोख बंदोबस्त मिरवणूक शांततेत.. 

♦️यंदा उच्चांकी मूर्त्यांचे रेकॉर्डने मुंबई पुणा अवतरली 

♦️ नगरपालिका ,एमएसईबी, राजकारणी, सेवाभावी, पत्रकार ,सर्वच विभाग  दिमतीला.

♦️ नियम तोड गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर कारवाई 

चोपडा दि. 12 (प्रतिनिधी) शहरात पाचव्या दिवशी श्रींचे विसर्जन होत असल्याने शहरातील जवळपास ७१ सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे गणपती बाप्पाला  जल्लोष पूर्ण वातावरणात ढोल ताशांच्या निनादात" गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या " च्या जयघोषात निरोप देण्यात आला.यावेळी प्रचंड पोलिसांच्या फौजफाट्यासह  जवानांच्या तुकड्यांनी  मोठ्या कसरतीने मोर्चा  सांभाळल्याने मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र काही मंडळांनी मिरवणूकीची मर्यादा ओलांडल्याने पोलिस तक्रारींला सामोरे जावे लागल्याचे समजते. यंदा  १५ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असल्याने कसरतीने आगेकूच करावी लागली.  विसर्जन मिरवणुकीत मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी साडेनऊ वाजताच विसर्जन मार्गावरून मार्गस्थ झाल्याचे पाहावयास मिळाले. दुसऱ्या दिवशी शहरभर  रस्त्यावर पडलेली गुलाल उचलण्यासाठी नगरपालिका कर्मचारी कामाला लागलेले होते.जवळपास १०ट्रक्टर गुलाल उचलण्यासाठी फावड्यांचा उपयोग करावा लागला असून सफाई कामगारांना तारेवरची कसरत करावी लागली.

जवळपास 18 ते 20 तास चालणाऱ्या या मिरवणूकीने  आशा टॉकीज, गोल मंदिर, चावडी, बोहरा गल्ली, मुस्तफा बाबा मशीद, आझाद चौक, पाटील दरवाजा, बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्टैंड या मार्गे नेहमीप्रमाणे आगेकूच केली.  बोहरा गल्लीत अरूंद रस्ता असल्याने  गणपती मंडळे लवकर पास होत नव्हते  त्यामुळे  चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना कसब पणाला लावावी लागली.


पोलिसांची चोख कामगिरी कौतुकास्पद व मान्यवरांकडून गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा सत्कार:-

चोपडा शहरातील मिरवणुकीला गालबोट लागू नये म्हणून पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाने चोपडा शहरात चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवलेला होता. त्यामुळे चोपडा शहरास छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले होते.यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे,आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार जगदीश वळवी, काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, चोसाका चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, भाजपाचे माजी सभापती आत्माराम म्हाळके,  माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, संजय कानडे, नंदकिशोर पाटील, किशोर चौधरी, संजीव सोनवणे, प्रदीप पाटील, नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र बिटवा यांच्यासह प्रति पक्ष कार्यकर्त्यांनी मंडळ कार्यकर्त्यांचा यथोचित गौरव केला.

*नगरपालिका कडून तापी नदीवर विसर्जन* :--

शहरासह तालुक्यातील गणपती मूर्तींचे विसर्जन हे गणेश मंडळाकडून तापी नदीवर केले गेले.सध्या तापी नदीला भरपूर पाणी असल्याने मूर्तीचे विसर्जन करतांना छोट्या मोठ्या मूर्ती नगरपालिकेने ताब्यात घेऊन क्रेनने नदीपात्रात विसर्जन करण्यात आले याकामी नगरपालिका मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली न प कर्मचारी आत्माराम बाविस्कर,राजेंद्र सतिश माळी,प्रकाश चव्हाण,भगवान अहिरे,राहुल निकम,प्रवीण सैदाणे,पिंटू संदांशिव,राजू माळी आदींनी याकामी परिश्रम घेतले.

पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस कविता नेरकर ठाण मांडून :- 

दरम्यान विसर्जन मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,चोपडा उपविभागी पोलीस अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचे सह वरिष्ठ पोलीस अधिकारी चोपडा शहरात विसर्जन मिरवणूक वेळी ठाण मांडून होते.

 वीज वितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रम :-

 दरम्यान यावर्षी 25 ते 30 फुटापर्यंत मुर्त्यांची उंची असल्यामुळे क्षणोक्षणी मृत्यांमध्ये विजेचे तार व वायर अडकत होते. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आशिष गायकवाड,अमित सुलक्षणे व इतर कर्मचाऱ्यांनी रात्रभर अथक परिश्रम घेऊन वीज पुरवठा बंद करणे व तात्काळ सुरू करण्यासाठी मेहनत घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने