चोपड्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.. ईद निमित्त माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा..!

 चोपड्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन.. ईद निमित्त माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना  शुभेच्छा..!

चोपडा दि१६(प्रतिनिधी): मुस्लिम बांधवांच्या पवित्र सण " ईद ए मिलाद "उत्सवाचे औचित्य साधत चोपड्याचे कार्यासम्राट माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे हे  समाजवादी विचारसरणीचे धुरंधर व्यक्तीमत्व माजी उपनगराध्यक्ष मेहमूदभाई बागवान यांच्या कार्यालयात जाऊन मुस्लिम बांधवांना  ईद ए  मिलाद च्या भरभरून शुभेच्छा देऊन हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन चोपड्यात घडविले. 

आज दिनांक 16/09/24 वार  सोमवार रोजी सकाळी  २:००वाजेच्या सुमारास चोपडा येथे मुस्लिम समाज यांच्या वतीने ईदुल मिलादुनबी मिरवणूक मुसतुफा बाबा दर्गा यांच्या समोर काढण्यात आली. त्यानंतर  माजी उपनगराध्यक्ष महेमुदभाई महंमद बागवान व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे  यांच्या वतीने सर्व मुस्लिम समाजातील बांधवांना ईद च्या शुभेच्छा देण्यात .यावेळी कृऊबा समिती सभापती नरेंद्र पाटील , माजी नगरसेवक विकास पाटील,  माजी उपनगराध्यक्ष  महेमुद बागवान, ऐजाज हाजी, अशपाक भाई, निस्सार बागवान,छब्बीर बागवान ईमरान खाटीक, मोईन कुरैशी, सैय्यद मजहर,मुद्सर भाई,नदीम भाई,बिलाल ,सैय्यद जाकीर शेख,फरमान मिसतरी,अजहर शेख, सरदार भाई, आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने