मौर्यक्रान्ती संघ व चोपडा तालुका सकल धनगर जमात यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळ्यात ६५ महिलांचा सन्मान..

 

मौर्यक्रान्ती संघ व चोपडा तालुका सकल धनगर जमात यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळ्यात ६५ महिलांचा सन्मान..

चोपडा,दि.१६ ( प्रतिनिधी):मौर्यक्रान्ती संघ व सकल धनगर जमात तालुका चोपडा यांचे माध्यमातून अहिल्यादेवी यांच्या त्रिशतःब्दी जयंती वर्षा  निमित्त,अहिल्यादेवी कन्या सन्मान सोहळा रविवार, दि-15/09/2025  रोजी मूकबधिर विध्यालय बोरोले नगर दोन चोपडा येथे घेण्यात आला.त्यात तालुक्यातील वेगवेगळ्या  क्षेत्रात  कार्य करणार्या ६५ महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात  नगर सेविका सरला शिरसाठ ,  पुष्पा सुलताने पो.पाटील,पुष्पा बापूराव कचरे पो.पाटील,वैशाली अविनाश सोनवणे पो.पाटील डॉक्टर,इंजिनिअर,शिक्षिका,आरोग्य  सेविका,वन विभागतील  कर्मचारी, वाहक परिवहन मंडळ,अंगण वाडी- शिक्षिका,मदतनीस  अधिकारी व कर्मचारी यांचा  समावेश होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  माजी महापौर सदाशिवराव ढेकडे दादा ,आण्णा  बन्सिलाल भागवत (राज्य उपाध्यक्ष मौर्यक्रान्ती संघ म.रा).,विठूसाहेब बोरसे (जळगाव जिल्हाध्यक्ष धनगर समाज),रविंद्र लाडगे  (जिल्हाध्यक्ष),पारखे नाना (निवृत नायब तहसीलदार) ,एस सी.तेले सर,गोपीचंद शिरसाठ सर,रमेश देव ही अमळनेर चे कार्यकर्ते,मूकबधिर विद्यालयाच्या अध्यक्षा लिला पाकळे  व पाकळे सर यांच्या सहकार्याने कार्यक्रमास जागा उपलब्ध करून करून दिली.
दीप प्रज्वलन व प्रतिमा  पूजन झाल्यावर मान्यवर पाहुण्यांचा  सत्कार करण्यात आला.
भागवत सरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासाला उजाळा देत  मार्गदर्शन केले.ढेकडे नानानी कंपणीत रोजगाराच्या देय करण्याबाबत सुचवले व मार्गदर्शन केले, विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच पवार मॅडम, बाविस्कर मॅडम व हडपे मॅडम यांनी मार्मिक व उपयुक्त माहिती पर मार्गदर्शन केले.माजी नगर सेवक महेंद्र धनगर,व्हॉईस चेअरमन ,गोपाल नवल धनगर,डॉ.नरेंद्र शिरसाठ आदिची उपस्थिती विषेश जाणवली.तसेच धनगर जमात बंधुभगिनी ही  मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.
बी डी पाकळे सरांनी सुत्रसंचालन  केले त्यांना तालुकाध्यक्ष डी एस धनगर सर साथ  यांनी  दिली .
कार्यक्रम यशस्वीते साठी शाम भाऊ धामोडे, जगदिश कंखरे सर, नितीन पाकळे,योगेश येहीदे.मनोज भालेराव,जिग्नेश हडपे,उमेश भीमराव  धनगर आदिंनी मेहनत घेतली . जिल्हा उपाध्यक्ष आर सी भालेराव सर  यांनी  आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने