गौरी(महालक्ष्मी)चे आज विसर्जन

 गौरी(महालक्ष्मी)चे आज विसर्जन

गणपूर(ता चोपडा)गौरी (महालक्ष्मी)ची स्थापना केलेल्या मुर्त्या

गणपूर,ता चोपडा दि. 12(प्रतिनिधी):  येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या जल्लोश्यात  गौरी(महालक्ष्मी)ची स्थापना काल विधिवत करण्यात आली.  नागेश कालिदास दीक्षित,मंगलदास कालिदास दीक्षित यांच्या कडे गौरींची दरवर्षी स्थापना करण्यात येऊन विविध पूजाविधी करण्यात येतात.आज महालक्ष्मीचा पूजनविधि करण्यात आला. महिला व भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. त्यानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी गौरींचे  विसर्जन करण्यात येणार असल्याचे बाळकृष्ण दीक्षित यांनी बोलताना सांगितले.          

भाद्रपद शुद्ध सप्तमी, अष्टमी,व  नवमी ह्या दिवशी जेष्ठा नक्षत्रा मध्ये महालक्ष्मी व्रत,जेष्ठा कनिष्ठा गौरी अशा दोन रुपात संपूर्ण भारतात व विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते.त्यांना विशेषतः संपूर्ण पुरण वरणाचा व 16 भाज्या एकत्र शिजवून नैवेद्य दिला जातो. व सर्वांच्या आरोग्याच्या व संपत्ती व संपदा यांची अष्ट लक्ष्मी ची प्राप्ती व्हावी हि कामना करून रात्री जागरण, भजन,गोंधळ केले जाते व तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. त्यानुसार आज विसर्जन होईल......


.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने