वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत किशोरी मुलींना आरोग्य किटचे वाटप

 वर्ल्ड व्हिजन इंडिया मार्फत किशोरी मुलींना आरोग्य किटचे वाटप 

धरणगाव दि.१०(प्रतिनिधी)आज दिनांक 10/09/2024 मौजे वंजारी  येथे वर्ल्ड व्हिजन इंडिया तर्फे किशोरी मुलींना आरोग्य किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी वर्ल्ड विजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे व सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक भिकन पाटील यांच्या हस्ते मुलीना आरोग्य किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात गावकऱ्यांनी प्रथम स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रत्येक मुलीचं आरोग्य चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे या प्रमुख विषयावर मार्गदर्शन केले. प्रकल्प अधिकारी, जितेंद्र गोरे वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव यांनी या प्रास्ताविक करताना सांगितले, तसेच आरोग्याची काळजी मुलींनी कशी घेतली पाहिजे तसेच आपली स्वतःची काळजी कशी घ्यावी अशा विविध विषयावर आशा वर्कर सोनाली चौधरी यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाला  माध्यमिक शाळेतील वंजारी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका चित्रा पाटील,सुमित्रा महाजन, पंचायत स्तरीय संमितीचे सदस्या मनीषा चौधरी, भारती काकडे, वर्ल्ड व्हिजन इंडिया चे निखिल कुमार सिंग, स्वयंसेवक वैष्णवी पाटील REC शिक्षक जयश्री महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अंकिता मेश्राम  यांनी केला. मुख्याध्यापक भिकन यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.  वर्ल्ड विजन इंडिया तर्फे एकूण 22 गावात किशीर मुलींना एकूण 500 मुलींना आरोग्य किट वाटप करण्यात सुरुवात केली त्यामधून वंजारी गावतील मुलींना वाटप करण्यात आली. या कार्यक्रमामुळे मुलींमध्ये आरोग्याची जनजागृती व पालक आणि मुली दोघींना एकत्र करून त्यांना महत्त्व पटवून देण्यात आले या साठी वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व उप्स्तीस्तींना मार्गीदर्शन केले तसेच मान्यवरांचे  मुलींना आरोग्याची अत्यंत गरज आहे आणि ही गरज ओळखून वर्ल्ड व्हिजन इंडिया यांच्या द्वारे आरोग्य कित वाटप करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने