अनवर्दे बुधगाव पीटीएस विद्यालयात ३१ हजारांचे ईलेक्ट्रीक साहित्य चोरी

 

अनवर्दे बुधगाव  पीटीएस विद्यालयात ३१ हजारांचे ईलेक्ट्रीक साहित्य चोरी

चोपडा,दि.७(प्रतिनिधी) तालुक्यातीलअनवर्दे बुधगाव गावाचे मधोमध असलेल्या पी. टी .एस. विद्यालयातून अज्ञात भामट्यांने ३१हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रीक सामान्य चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली.अज्ञात चोरट्याविरुद्ध मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून चोरटा लवकरच पोलिस जाळ्यात अडकेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,  पंडितराव त्र्यंबकराव सांळुखे विद्यालय अनवर्दे बुधगाव येथे  या शाळेत  इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग असुन सकाळी 10  ते सांयकाळी 05/00 वाजे पर्यत शालेय वर्ग सुरू असतात. शाळेत संगणक, टेबल खुर्ची, सोलर बॅटरी, फॅन अश्या प्रकारचे विविध साहित्य असुन ते  शिक्षक दालनात ठेवलेले असते. शाळेतील सर्व शिक्षक, शिपाई हे दि ६/०८/२०२४रोजी सांयकाळी05/00 वाजे पर्यत शाळेचे दैनदिन काम आटोपून    घरी गेलेले असतांना  दुसऱ्या दिवशी  शाळेतील शिपाई प्रकाश दादागीर गोसावी यांस  गावातील शेतकरी नवल मुरलीधर वाघ यांनी  शाळेचे आवारात केबल वायर पडलेली असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगीतले त्यावरून मुख्याध्याक बळवंत भिकनराव सोनवणे यांना कळविल्या वरून ते शाळेचे आवारात आले असता केबल वायर तुटुन पडलेली दिसली तसेच ट्युबेलचे पाईप तोडुन नुकसान केलेले दिसले  शाळेतील खोल्या चेक केल्या असता शाळेतील शिक्षक दालनातील सोलर बैटरी, छोटा फॅन, ट्युबेल स्टाटर, परिसरातील ट्युबेल मधील 03 एच पी मोटर असा ३१हजार ३०० रुपयांचा ऐवज  अज्ञात लांबविल्याचे आढळून आले. याबाबत ग्रामीण पोलिसांत मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने