हातेड श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात महसूल पंधरवाडा निमित्त युवा संवाद

 हातेड श्री शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात महसूल पंधरवाडा निमित्त युवा संवाद


   चोपडा दि.७(प्रतिनिधी)महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील निर्णय प्रमाणे चोपडा तालुक्यात महसूल पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, त्यानुसार चोपडा तहसिल कार्यालय मार्फत आज दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हातेड येथे युवा संवाद आयोजित करण्यात आला होता.

 सदर कार्यक्रम साठी हातेड हायस्कूल चे स्कुल कमिटी चेअरमन रावसाहेब संदीप सोनवणे, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, हातेड बु, हातेड खु, गलवाडे गावाचे सरपंच, चोपडा तहसिल कार्यालयात कार्यरत निवासी नायब तहसिलदार श्री योगेश पाटील, नायब तहसिलदार (महसूल) श्री आर आर महाजन, सूतगिरणी संचालक रमेश नाना, तिन्ही गावातील विविध संस्था चे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री पी सी पाटील सर, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हातेड भागाचे मंडळ अधिकारी श्री रवींद्र माळी, तलाठी श्री प्रशांत पवार, सुधाकर महाजन, संतोष कोळी, वंदना कोळी, तिन्ही गावांचे बी एल ओ, तिन्ही गावांचे पोलिस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल हातेड खु श्री जितेंद्र चौधरी व ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर लेझीम पथकाने सुंदर लेझीम नृत्य सादर करून मान्यवर यांचे स्वागत केले. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले. सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले.  प्रस्तुत कार्यक्रमात महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती व महसूल दिनाचे महत्व श्री रवींद्र माळी यांनी प्रास्ताविक मध्ये मांडले. तसेच कार्यक्रमात नवंमतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप करण्यात आले, सलोखा योजना लाभार्थ्यांना फेरफार नोंद व दुरुस्ती सातबारा उतारा मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. संजय गांधी योजनेचे लाभार्थी व लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना लाभ मंजूर बाबत पत्र देण्यात आले. नवीन डिजिटल रेशनकार्ड देखील वाटप करण्यात आले व शाळेतील अनेक विध्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री योगेश पाटील साहेब यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा बाबत संवाद साधला व कठीण परिश्रम घेतल्यास यश मिळविणे अवघड नाही असे मार्गदर्शन केले तर आर आर महाजन साहेब यांनी आपल्या मनोगत मध्ये युवक, विद्यार्थी, ग्रामस्थ व शेतकरी यांचेशी संवाद साधत महसूल विभागाच्या योजना, इ चावडी, इ पिकपाहनी, इ हक्क याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संदीप सोनवणे यांनी विद्यार्थी शी संवाद साधत गावातील तलाठी कार्यलय नूतनीकरण ची मागणी केली. सदर कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री रमाकांत धनगर सर यांनी मानले. शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व प्रत्येक्ष शेतात जाऊन पिकपाहनी अँप चे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच मंडळ अधिकारी व हातेड भागातील सर्व तलाठी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने