शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बोगस मतदारांची नावे वगळण्याची संदीप बेडसेंची मागणी


शिंदखेडा विधानसभा मतदार संघातील बोगस मतदारांची नावे वगळण्याची संदीप बेडसेंची मागणी 

 शिंदखेडा,दि.५(प्रतिनिधी)शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील दुबार/बोगस मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप दादा बेडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

मागील दहा वर्षांपासून म्हणजेच 2014 व 2019 ची विधानसभा निवडणूक तसेच गेल्या दहा वर्षात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात असे निदर्शनास आले आहे की, संपूर्ण शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बुथवर मोठ्या प्रमाणात बोगस/दुबार मतदार नोंदणी झालेली आहे. याबाबत शिंदखेडा तालुक्यातील संबंधित निवडणूक यंत्रणेला वेळोवेळी अवगत केले आहे.

मी स्वतः मा. तहसीलदार शिंदखेडा यांना दिनांक 24-7-2024 रोजी व आज दिनांक 5-8-2024 ला भेटुन पत्र दिले असुन सोबत बुथनिहाय असलेले दुबार/बोगस नावांची यादी जमा केली आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने विधानसभा मतदारसंघात मतदान होऊ नये यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालून सहकार्य करावे असे संदीप दादा बेडसे यांनी श्री गंगाराम तळपाडे (उपजिल्हाधिकारी- निवडणूक शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांना निवेदन देत सोबत 338 बुथचे बुथनिहाय असलेले दुबार/बोगस नावांची यादी पण सुपुर्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने