समाजकार्य महाविद्यालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट निर्देशक जागरूकता बेबीनार संपन्न

 समाजकार्य महाविद्यालय  व रोटरी क्लब  यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट निर्देशक जागरूकता बेबीनार संपन्न

चोपडा दि.६(प्रतिनिधी):भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय  व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एक्सलन्स ग्लोबल स्किल्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने *करिअर गायडन्स ऑन फायनान्शियल लिटरसी, एज्युकेशनल अँड मोटिवेशनल* या विषयावर दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेबीनारचे अध्यक्षपद समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर सौदांणकर  यांनी भूषविले.या वेबिनारचे साधन व्यक्ती म्हणून श्री देवीजेन  दत्ता यांनी आपल्या मार्गदर्शनातून E-KYC, power of attorney, बेसिक सर्विसेज आँफ फाइनेंशियल मैनेजमेंट, म्युच्युअल फंड, निवेश इत्यादी संदर्भातील अनेक अनभिज्ञ असणाऱ्या मुद्द्यांवर अतिशय सखोल पणे व सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या वेबिनारला एकूण ६० व्यक्ती सहभागी होत्या. ज्यामध्ये समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच रोटरी क्लब ऑफ चोपड्याचे श्री विलास पाटील, श्री पवार इत्यादी अनेक सदस्य उपस्थित होते.या वेबिनारचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ अनंत देशमुख यांनी काम पाहिले तर या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी Excellence Global Skills training and development organisation च्या निकिता चौधरी यांचे तसेच समाजकार्य महाविद्यालय ,चोपडा येथील श्री प्रमोद वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने