तहसीलदारांच्या सूचनेवरुन " ई"पॉस मशिन जमा न करता निवेदन सादर

 

तहसीलदारांच्या  सूचनेवरुन " ई"पॉस मशिन जमा न करता निवेदन सादर 

लासूर ता‌.चोपडा,दि.५(वार्ताहर) आखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या नेतृत्वाखाली चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दि 5/8/2024 रोजी ई पोस मशिन जमा आंदोलन करण्यात आले .यावेळी चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन यांना निवेदन देण्यात आले 

निवेदनात म्हटले आहे की  ई पोस मशिनचे सर्वर डाऊन मुळे जुलै 2024 चे धान्य दूकानात उपलब्ध असूनही कार्डधारकांना वितरीत करण्यात आले नाही या मशिन मुळे दूकानदार व कार्डधारक यांच्यात वाद होत असून सर्वरची समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे यावेळी ई पोस मशिन तहसिल कार्यालयात जमा न करता फक्त निवेदन देण्यात आले यावेळी चोपड्याचे तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले की आपल्या अडचणी शासनापर्यंत पोहचविण्यात येतील ‌ यावेळी चोपडा संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी दुकानदारांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली  निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील,उपाध्यक्ष मधूकर राजपूत सचिव ए‌.डी‌.कोळी, खजिनदार दिलीप पालीवाल तसेच पी ‌.एम‌.पाटील, कांतीलाल चौधरी,ए‌.टी‌.जैन, प्रभाकर महाजन, रुपेश कोष्टी, अनिल कोळी, शैलेश जैन,पुनमचंद भावसार, गजानन पाटील,अशोक चौधरी, चंद्रकांत नेवे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी व व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने