परिसपार्क ते धनवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दूर्दशा .. खड्डे च खड्डे असल्याने वाहन चालक त्रस्त

 परिसपार्क ते धनवाडी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दूर्दशा .. खड्डे च खड्डे असल्याने वाहन चालक त्रस्त


चोपडा,दि.५(प्रतिनिधी) शहरातील कॉलेजच्या  बाजूला असलेल्या परिसपार्क ते धनवाडी फाट्यापर्यंत असलेल्या वाहतूक मार्गाची अवस्था खुपच बिकट झाली झालेली आहे, ह्या रस्तावर २४ तास वाहतूक ही सुरू असते, त्यातच या भागात वाहतूक मार्गावर खड्डे च खड्डे पडले असून तुडुंब पाण्याने भरलेला तलाव अशी परिस्थीती निर्माण झाली असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे . न.पा. प्रशासनाने रस्त्याचे गांभीर्य ओळखून ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.

या रस्त्यावर मोटार सायकलस्वार जीव मुठीत धरून चालवत असून किरकोळ अपघात पाचवीला पूजले आहेत.हा रस्ता  शेत रस्ता सारखा झाला असून त्वरित दुरुस्ती व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने