यावल ग्रामीण रुग्णालयावर निळे निशाण संघटनेचा मोर्चा.. तात्काळ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची करण्याची मागणी

 यावल ग्रामीण रुग्णालयावर निळे निशाण संघटनेचा मोर्चा.. तात्काळ स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांची करण्याची मागणी 

यावल दि.५(प्रतिनिधी):यावल ग्रामिण रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणुक करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन मोर्चा काढून निळे निशाण संघटनेने दिले तात्काळ मागण्या मान्य न केल्यास भविष्यात तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  निवेदनात   ग्रामिण रुग्णालय यावल चे वैदकिय अधिक्षक यांनी शासनाची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने दिलेल्या लेखी पत्राची चौकशी करण्यात यावी,यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी विविध तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी  ,प्रसुती करिता आलेल्या महिलेस सिझर करण्याची गरज असल्यास तात्काळ सिजर करण्याची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.

  याप्रसंगी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे , जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम , फैजपुर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तडवी व अनिल इंधाटे , यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे , मांगीलाल भिलाला , नानु बारेला , मिलीद सोनवणे , इंदिरा भिलाला , सपना सोनवणे , मनिषा बागुल , विजया सोनवणे , दिपक मेढे , रविंद्र मेढे , अनिल तायडे , जगन तायडे  व असंख्य महिला - पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने