अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चोपडा येथे मोर्चा

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चोपडा येथे मोर्चा

चोपडा,दि.५(प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ  देण्याबाबत आश्वासन दिलेले होते ते अजून पाळलेले नाही म्हणून महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे  म्हणून चोपडा येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन तर्फे इशारा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते अमृत महाजन, ममता महाजन ,प्रतिभा पाटील ,वैशाली पाटील, तडवी ,देवश्री कोळी यांनी केले .प्रकल्प कार्यालयावर मोर्चाचे निवेदन  सुपरवायझर श्रीमती  रत्नमाला शिरसाट व पूनम ठाकरे  यांनी स्वीकारले. 

 निवेदनात  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी सरकारने 12/7/ 2024 रोजी जी काही बोलनी केली त्या नुसार आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावप्रमाने अंगणवाडी सेविका यांना १००००  रुपये तर मदतनिस यांना ७.५००रुपये मानधन वाढ द्यावी तसेच पेन्शन लागू व्हावी,सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सेवानिवृत्त सेविका मदतनीस यांना ग्रॅच्युइटी  द्यावी,  गेल्या संप काळातील दोन महिन्याच्या  कपात पगार मानधन अदा करावे,आदि मागण्या मांडण्यात आल्या आहेत.त्या पूर्ण झाल्यास 13 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.

मोर्चा यशस्वीतेसाठी ठगूबाई पाटील ,सिंधुबाई पाटील , हिराबाई महाजन, प्रगती ढिवरे ,शोभा कोळी, उषा पाटील, निर्मला सांगोरे ,कविता महाजन ,सुलोचना पाटील ,मनीषा पाटील व कॉम्रेड गोरख वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने