पोलिस कॉन्स्टेबलची तारेवरची कसरत..अन् ४० फुट खोल तलावातून मृतदेह काढतांना स्वतःचा जीव घातला जोखीममध्ये

 

पोलिस कॉन्स्टेबलची तारेवरची कसरत..अन् ४० फुट खोल तलावातून मृतदेह काढतांना स्वतःचा जीव घातला जोखीममध्ये

धुळे दि.५(प्रतिनिधी) जिल्ह्यातील नरडाणा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या शिरोळे गावाजवळील ४० फुट खोल तलावात दोर च्या सहाय्याने अत्यंत जिकिरीचे अवस्थेत उतरून एका बेशुद्धावस्थेतील पुरुष देहास बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी केला मात्र दूर्देवाने सदरील व्यक्ती मयत झालेला असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरांनी मयत असल्याचे स्पष्ट केले असता गावभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सविस्तर माहितीअशी की,  नरडाणा पोलीस स्टेशन येथे शिराळे गावाचे पोलीस पाटील तुषार पाटील यांनी माहिती दिली की, शिराळे गावाच्या नजीक असलेल्या तलावात एका इसमाचा मृत देह तरंगत आहे. अशी माहिती मिळाल्या वर डायल 112 वर कार्यरत असलेले पो. ना.बी.आय.पाटील व पो.कॉ विनोद कोळी  हे घटना स्थळी पोहचले . मृत देह शिराळे गावाच्या नजीक तलावात अवघड अशा ठिकाणी होता तिथे उतरणे ही अवघड होते तलाव साधारणतः 40 फूट खोल होता अशा वेळी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी व शिराळे गावातील विठ्ठल पाटील हे तलावात दोराच्या साहाय्याने उतरून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इसमाचे देह  बाहेर काढला त्यानंतर पोलीस पाटील गव्हाणे, पोलीस पाटील शिराळे यांच्या मदतीने सदरील इसमास नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले .डॉक्टरांनी तपासून पाहिले असता मयत असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा मृत देह हा सतिष साहेबराव पवार वय -44 रा. दत्ताने ता. शिंदखेडा जि. धुळे. असे समजते.सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या आदेशान्वये - पोलीस हेड कॉन्स्टेबल /पवार करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने