विम्यावरील जीएसटी कमी करा बँकांमार्फत विमा विक्री बंद झाली पाहिजे राजद चे प्रशांत बोरकर यांची मागणी

 विम्यावरील जीएसटी कमी करा बँकांमार्फत विमा विक्री बंद झाली पाहिजे राजद चे प्रशांत बोरकर यांची मागणी



मुंबई,दि.५ :विमा हे नुकसान  भरपाई चे तत्त्व असल्याने विमा यावर जीएसटी सामाजिक न्याय आणि माणुसकीच्या दृष्टीने कर लावणे अनैतिक आहे तसेच बँकेमधील कर्ज काढताना विमा विक्रीही बेकायदेशीर रित्या होत असल्याने ग्राहक कायद्याचे उल्लंघन असल्याने बँकांमध्ये विमा विक्री बंद करावी अशी मागणी ग्राहक मानवी हक्क चळवळीचे अभ्यासक .विमा क्षेत्रातील जाणकार राष्ट्रीय जनता दलाचे सर्वात  ज्येष्ठ नेते समाजवादी  विचारवंत भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 भारतीय देशात  विमा प्रतिनिधी आग्रह करून सेवा देऊन जनतेकडून विमा काढण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या विम्याचे महत्त्व सांगत असतात . विम्याला गुंतवणुकीला जोडून परताव्याचे पद्धतीने जनता पाहत असते त्यावर आता मोठ्या प्रमाणावर जीएसटी लावल्याने जनता प्रचंड नाराज झाली आहे जीएस टी  रद्द करण्याच्या आमच्या मागणीला आता नितीन गडकरी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा दुजारा  पाठिंबा दिला आहे .केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषद मध्ये विम्यावरील जीएसटी कर तातडीने रद्द करावा तसेच जीएसटी बरोबर गुंतवणुकीमध्ये मॅच्युरिटी ला कोणते प्रकारचा टॅक्स लावणे बंद करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने