चोपडा कॉलेजात वाणिज्य दिनानिमित्त CA आपल्या भेटीला कार्यक्रम

 

चोपडा कॉलेजात वाणिज्य दिनानिमित्त CA आपल्या भेटीला कार्यक्रम 

चोपडा दि.5(प्रतिनिधी):दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग यांच्यातर्फे वाणिज्य दिनानिमित्त CA आपल्या भेटीला मार्गदर्शनपर कार्यक्रम दिनांक ०५/०८/२०२४ रोजी, आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. पार्थ महेश अग्रवाल (CA ) यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. श्री पार्थ अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना CA/CS  पास होण्याकरिता वेगवेगळ्या परीक्षांचे दाखले देत मार्गदर्शन केले. 

          सदर  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए.सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन CA पास होऊन महाविद्यालयाचे नावलौकिक करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेश वाघ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन. बोरसे, समन्वयक श्री. पी. एस. पाडवी, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी.आर. देवरे सह श्री दीपक डी. करंकाळ मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी सोनल कुंभार, मानसी पावनकर व श्री निवृत्ती पाटील यांनी करून आभार श्री व्ही. डी. शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने