राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आदिवासी दिवस वृक्ष लागवडीने साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजितदादा पवार)  जागतिक आदिवासी दिन साजरा 

चोपडा दि.१०(प्रतिनिधी) दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदिवासी दिनाचे निमित्त साधून निसर्गाचे संवर्धन व्हावे या हेतूने चहार्डी ता.चोपडा  येथे मोकळ्या रानात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी सुनील पाटील यांनी बोलतांना सांगितले की, आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरिता ज्या थोर पुरुषांनी मोलाचे योगदान दिले त्या सर्वांचे प्रामुख्याने स्मरण केले. चहार्डी गावातील उपस्थित सर्व आदिवासी बंधू-भगिनींना आदिवासी व क्रांती दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जल, जंगल व जमीन याचे संरक्षण करणे ही आदिवास्यांची  व शासनाची नैतिक जबाबदारी असल्याबाबत स्पष्ट करून आदिवासी ही जमात भारत देशाचा मूळ कणा असून आदिवासी समाजाचे सर्व न्याय हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी शासनाने कटिबद्ध असले पाहिजे असे वक्तव्य केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा नेमाडे, जिल्हा बँक संचालक घनश्याम भाऊ अग्रवाल, माजी जि. प. सदस्य सुनील आबा पाटील, ज्येष्ठ नेते  प्रवीण भाई गुजराती, जिल्हा संघटक परेश  देशमुख, चो.सो.का.संचालक सुधाकर यशवंत पाटील, माजी व्हाॅ.चेअरमन शेतकी संघाचे सुधाकरनाना ,वि.का.सोसायटी चेअरमन लक्ष्मण प्रभाकर चौधरी, पीक संरक्षण चेअरमन जे.जे.पाटील , निंबा ताराचंद पाटील, संतोष बळीराम पाटील, मगन गटलु धनगर, खंडेराव पाटील माजी चेअरमन मनोज शहा, बंटी पाटील,निलेश  पाटील, चंद्रकला ताई पाटील सरपंच चहार्डी, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश  देशमुख, युवक तालुकाध्यक्ष भूषण  पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकेश  पवार, सामाजिक  युवक शहराध्यक्ष शहर शुभम सोनवणे ,विभागाचे कार्याध्यक्ष किरणजी मोरे, शहराध्यक्ष मिलिंदजी सोनवणे,  महिला तालुकाध्यक्ष सविता ताई पाटील,  शहराध्यक्ष स्वातीताई बडगुजर, सिंधुताई चौधरी, अल्का ताई भिल्ल, अजुन  कोळी ग्रा.प.सदस्य चहार्डी, सूतगिरणी संचालक विनोद  पाटील, बाजार समिती संचालक भरत पाटील , मिलिंदजी बडगुजर , सिताराम बारेला,रुमात्या बारेला, शांताराम बारेला,किलेरसिग बारेला, किशोर भिल्ल, रविंद्र भिल्ल , बाबुलाल भिल्ल,जंगलु भिल्ल सर्व ग्रामस्थ, आदिवासी बंधू भगिनी तरुण, तरुणी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने