आदिवासी दिनी चोपड्यात धूम धडाक्याचा "चंद्र" प्रकाश "रेकॉर्ड ब्रेक" रॅलीत माजी आमदार प्रा.सोनवणेंची बाजी

आदिवासी दिनी चोपड्यात धूम धडाक्याचा "चंद्र" प्रकाश "रेकॉर्ड ब्रेक" रॅलीत माजी आमदार प्रा.सोनवणेंची बाजी

चोपडा दि.१०(प्रतिनिधी):चोपडा तालुका हा गत् 15 वर्षांपासून आदिवासी मतदार संघ म्हणून राखीव असल्यामुळे  आदिवासी आमदार  सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी अथक परिश्रम घेऊन आदिवासी भागात प्रचंड  कामे करून  परिसराचे रुपच  पालटवून टाकल्याने समाजात  अद्भूत अशी जन जागृती निर्माण होऊन आख्ख्या उत्तर महाराष्ट्रात साजरा होत नाही असा "आदिवासी दिवस" चोपड्यात मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे.याचा हेवा प्रति पक्ष असलेल्या पक्षातील ईच्छाधारी राजकारण्यांना  होऊन राजकीय मनसुबे जिवंत ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धा सुरू झाली आहे.परिणामी चोपड्यात एकाच दिवशी २० ते २५ बॅंड पथकांचा निनादात, डोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वेशभूषेत समाज बांधवांचे पाय थिरकायला लागले आहेत.तीन नेत्यांच्या  तीन रॅली पैकी तोबा गर्दी असलेली रेकॉर्ड ब्रेक 'नंबर वन' रॅली माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाची ठरल्याची  पुष्टी तालुक्यातील  जनता देत आहे.डोळे विस्फारणाऱ्या मिरवणूकीने पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली आहे. यंदा माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात वेग वेगळ्या रॅलीने  परिसर दणाणून सोडला आहे. तिघा नेत्यांच्या नावात "चंद्र" असल्याने मिरवणूकीतील उल्हासरूपी प्रकाशाचा तेज सर्वत्र झळाळले.

चोपड्याच्या राजकारणात गेल्या १५ वर्षा आधी कोणताही विकास न झाल्याने आदिवासी जमातीत  म्हणावी तशी जन  जागृती नव्हती आता मात्र आदिवासी आमदार सोनवणे दाम्पत्याच्या कुशाग्र बुध्दी, धडपड व धडाकेबाज विकासाची कामगिरी दाराजवळ  पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जागृती होऊन आदिवासी दिनाचे महत्त्व हर एक व्यक्तीच्या डोक्यात अधोरेखित झाल्याने कम्मालीचा उत्सव साजरा व्हायला लागला  आहे.या आधीही  आदिवासी समाजातीलच आमदार खुर्चीवर विराजमान होऊन गेलेत तरीही त्या काळात आदिवासी परिसर जैसे थे तसाच होता . आता या परिसरातील वाड्या वस्तीत विकास झाल्याने अनेक विरोधी राजकारण्यांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.परिणामी 9 ऑगस्ट आदिवासी दिवस हा राजकारण्यांसाठी शक्ती प्रदर्शन म्हणून साजरा होत असल्याचे चित्र  आज चोपड्यात पाहावयास मिळाले.

डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या गटाची ही रॅली* 

तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या वतीनेही  जागतिक आदिवासी दिवस  साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी विधानसभापती श्री अरुण भाई गुजराथी यांनी भूषविले. गो.भी.जींनीग येथे कार्यक्रम आटोपून शहरभर मिरवणूक काढण्यात आली.

माजी आ.जगदिशचंद्र वळवी यांनीही काढली मिरवणूक

 चोपडा विधानसभेचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनाचे औचित्य साधत विशाल मिरवणूक काढण्यात आली.यावेळी त्यांच्या पत्नी सौ.वळवी,डी.पी.साळूंखेसर, ज्योती पावरा यांनी रॅलीचे नेतृत्व सांभाळले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने